कु. भाग्यश्री सातपुते चे एसएससी परीक्षेत घवघवित यश

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर द्वारा जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बागला कॉन्वेंट चिमुर ची विद्यार्थीनी कु.भाग्यश्री महेश सातपुते हिने घवघवित यश सपांदन केले आहे .कु. भाग्यश्री ने ९० .४० टक्के गुण प्राप्त केले आहे. भाग्यश्री ला इंग्रजी विषयात ९२ , मराठी ९० , हिंदी ८८ , गणित ८३ , विज्ञान आणि तंत्रज्ञान ९१ तर सोशल सायंस मध्ये ९१ गुण मिळवीले आहेत.
कु.भाग्यश्री महेश सातपुते ही मुळ चिमुर ची असुन तिचे ५ते १० वि पर्यंत चे शिक्षण बागला कॉन्वेंट चिमुर मध्येच झाले आहे वडील ती पाच वर्षांची असतांनाच वारले भाग्यश्रीची आई सौ.सरीता महेश सातपुते यांनी भाग्यश्रीला लहाणपणा पासुनच अभ्यासाची ओठ लावली व भाग्यश्रीने जिद्द व चिकाटीने अभ्यास करुण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९० .४० टक्के घेऊन मोठे यश संपादन केले तिने आपल्या या यशाचे श्रेय आई सौ सरीता सातपुते शाळेच्या मुख्याध्यापका तसेच शिक्षकांना दिले या तीच्या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.