प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाअभावी विठ्ठलवाड्यात होणारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण लांबणीवर

गावकऱ्याच्या आनंदावर विरजण
ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
मागील वर्षीपासून कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जगाला कोरोनाचा सामना करावा लागत आहे. या महामारीमध्ये लाखो लोकांना प्राण गमवावा लागत आहे. अश्यातच रेमडेसिविर या प्रतिबंधात्मक औषधीला सरकारने मान्यता दिली असल्याने संपूर्ण भारतामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले.त्याच अनुषंगाने दिनांक 20-04 2021 रोज मंगळवारला सकाळी 9:00 गोंडपीपर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे लसीकरनाचे आयोजन केले असल्याचे गावात दवंडी पिठवुन दि.19 एप्रिल च्या रात्रौ ला सांगण्यात आले की’ 45 वर्ष वरील नागरिकांनी आधारकार्ड तसेच मोबाईल नंबर सोबत घेऊन जिल्ह्या परिषद उच्च प्राथमिक शाळेत जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत विठ्ठलवाडा तर्फे करण्यात आले आहे.नागरिकांनी या लसीकरनाला लस महोत्सव म्हणून साजरा करावा तसेच या लसीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा. आपल्या गावात लसीकरण होणार असल्याने विठ्ठलवाडा येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु दिनांक 20 एप्रिल रोजी नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेत लस टोचण्याकरिता गेले असता आज लसीकरण होणार नाही असे विट्ठलवाडा ग्रामपंचायत च्या कर्मचाऱयाद्वारा सांगण्यात आल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजन पडले .आणि आयोजीत लसिकरण केंद्रा वरून निराश होऊन परतावे लागले.