आसेफ खान यांच्या पाथरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक व विक्रमी विजय मिळवला. माहाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आणि पाथरीच्या जनतेच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षासह ९ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला. माहाराष्ट्र राज्यचे अल्पसंख्याक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सईद खान यांचे मोठे बंधु पाथरी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आसेफ खान यांचा पदग्रहण सोहळा पाथरी नगरपरिषदेत जनतेच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहपूर्ण पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्यचे अल्पसंख्याक अध्यक्ष सईद खान म्हणाले की पाथरीच्या जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे विजयाचे यश डोक्यात न जाऊ देता पुढील पाच वर्षे अविरत लोकसेवा करा व जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिया आणि विकासाची कामे करा असा संदेश दिला पाथरीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत लोकनियुक्त नगराध्यक्ष आसेफ खान व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आली
या प्रसंगी शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका शिवसेना पक्षाचे पदाधिकारी,पाथरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज तब्बल ३५ वर्षांनंतर आज पाथरी नगरपालिकेवर शिवसेनेचा झेडा फडकला हा क्षण शिवसेनिकांसाठी आणि पाथरी मतदारसघांसाठी,शहराच्या जनतेसाठी अभिमानास्पद आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे ९० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करून पाथरीच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम आम्ही केलं. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, दवाखाना ,नागरी सुविधा यांसह हजारो युवकांना रोजगार देणारी भव्य रोजगार मेळाव्याच आयोजन करणार आहोत. यामुळे शहराचा कायापालट होईल. समाजकारणात आल्यापासून केलेला विकासाची गंगा शहरात आणण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरत आहे.या कार्यक्रमात पाथरी शहरातील मोठ्या संख्येने सर्व सामान्य जनता उपस्थित होती









