श्री विश्वकर्मा औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित चिमूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
श्री विश्वकर्मा औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित चिमूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 26/9/2021 रोज रविवार ला संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष सारंग उर्फ दाभेकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेचा कोरम पूर्ण न झाल्याने सभेच्या नोटीसमध्ये दिलेल्या नियमानुसार सभा तहकूब करून अर्धा तासानंतर तहकूब सभा घेण्यात आली सभेत खालील प्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेणयात आले संस्थेचे कार्यक्षेत्र तालुका पुरते न ठेवता चंद्रपूर जिल्हा मर्यादित करण्यात यावे. संस्थेचे कार्य सांभाळण्या करता व्यवस्थापक 1, संगणक चालक 1, लिपिक 1, शिपाई 1, चौकीदार 2, तसेच लोहारी 2, सुतारी 2, वायरमन 2, मोटर मेकॅनिकल 2, डिझेल मेकॅनिकल 2, वेल्डर 2, पत्रे कारागीर 2, नळ कारागीर 2, फिटर 2, इलेक्ट्रिशियन 2, गवंडी 2 इत्यादी कर्मचारी तथा इतर कामगार भरती करण्यात यावे. संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे निवडणूक घेण्याबाबत निबंधकांना कळविण्यात यावे. संस्थेच्या उपविधी प्रमाणे सभांना नेहमीच गैरहजर असणाऱ्या सभासदांना तसेच संस्थे विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे. संस्थेचे भांडवल वाढवण्याकरता कमीतकमी प्रत्येक सभासदांनी पाच हजार रुपये पर्यंतचे भाग खरेदी करण्यात यावे. सहा महिन्याच्या आत उद्योग सुरू होण्याच्या दृष्टीने आर्किटेक कडून बांधकामाचा प्लान आणि अंदाजपत्रक एमआयडीसीकडून मंजूर करून घेणे. इत्यादी महत्वाच्या निर्णय सोबतच सन 2022 करता अंकेक्षक म्हणून श्री चव्हाण नागपूर यांची नियुक्ती करण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला. गुरूदास सोनटक्के, दिवाकर दाभेकर, वसंतराव बावनकर, जगदेव छापेकर, रतिराम चनोडे, नामदेव चनूरकर, माणिक छापेकर, सतीश बावणे, कांताबाई मेसेकर, प्रेमिला सोनटक्के, वंदना चनोडे, माला बावणे, वर्षा औतकर यासह इतर समाज बांधव उपस्थित होते