ताज्या घडामोडी
आविस अध्यक्ष बानय्या जनगाम कडून आर्थिक मदत

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा तालुक्यातील वेंकटापूर येथील तिरुपती निकाडे यांच्या मुलगी अंजली निकाडे वय 9 वर्ष हिला कुत्रा चावल्याने मुलगी गंभीरपणे जखमी झाली होती. जखमी मुलगीला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे आणून उपचारासाठी दाखल केले आहे.

जखमी मुलगी अंजली निकाडे ला जखमा गंभीर असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाणे गरजेचे होते. ही बाब ग्राम पंचायत वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम यांनी आविस अध्यक्ष जनगाम यांना माहिती देताच आविस अध्यक्ष आणि सरपंच यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालय गाठून जखमी मुलगी बद्दल वैधकीय अधिकारीसोबत बोलून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करून जखमी मुलगीला पुढील उपचारासाठी गडचिरोली ला पाठविण्यात आले आहे.
यावेळी आविस अध्यक्ष बानय्या जनगाम,सरपंच अजय आत्रामसह आविस कार्यकर्ते उपस्थित होते