ताज्या घडामोडी
वझुर खुर्द येथील संस्कार प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत तालुक्यातील वझुर खुर्द येथील संस्कार प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माराम शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे दिनकर गवळी व हनुमान शिंदे ,तसेच शेख हय्यातभाई हे मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी आत्माराम शिंदे ,दिनकर गवळी ,शेख हय्यातभाई आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमात
शिवजयंतीच्या निमित्ताने वाचनालयामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विश्र्वांभर परांडकर यांनी आभार व्यक्त केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप अग्निहोत्री ,सौ शोभा परांडकर आदीनी परिश्रम घेतले .