ताज्या घडामोडी

अभाविप वरोरा तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन

भारत माता पूजन व ध्वज मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम थाटात संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभाविप वरोरा शाखेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यंदा 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अभाविप वरोरा शाखेतर्फे वरोरा शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे नियम व अटींचे पालन करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी स्थानिक ऋग्वेद कोचिंग क्लासेस, स्नेह नगर, अभ्यंकर वॉर्ड येथे प्रा.प्रणाली बेदारकर मॅडम यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून भारत मातेचे पूजन करण्यात करण्यात आले. यानंतर अभाविप कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजाला मानवंदना देत सामूहिक राष्ट्रगान घेण्यात आले. सर्वांना मिठाईचे वाटप करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यानंतर सद्भावना चौक येथे माजी सैनिक असलेले सागर कोल्हे, प्रवीण चिमुरकर,रवी तुराणकर, मार्शल ट्रेनर रवी चरूकर यांच्या उपस्थितीत व माजी सैनिकांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. ध्वजाला मानवंदना देत सामूहिक राष्ट्रगान करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यानंतर हुतात्मा योगेश डाहुले स्मारक येथे नगरसेवक छोटू भाऊ शेख, व शहरातील गणमान्य नागरिक व्यावसायिक, व अभाविप कार्यकर्ते यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले व भारत मातेच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. एअरब्रॉंन अकॅडमी वरोरा चे विद्यार्थी विद्यार्थिनी स्थानिक नागरिक, अभाविप पूर्व कार्यकर्ता, हितचिंतक शहरातील विविध सामाजिक संघटना यांच्या सोबत ध्वजाला मानवंदना देऊन सामूहिक राष्ट्रगान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले व मिठाईचे वाटप करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर वीर सावरकर चौक, लोखंडी पाण्याच्या टाकीजवळ नगरसेवक दिलीप घोरपडे, नगरसेवक बाबा भागडे, अभाविप माजी अध्यक्ष प्रा. गुरुदेव जुमडे,प्रांत कार्यकर्णी सदस्य प्रा. धनंजय पारखे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. व रजत गायडन्स पॉईंट चे विद्यार्थी स्थानिक नागरिक पूर्व कार्यकर्ता अभाविप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ध्वजाला मानवंदना देऊन सामूहिक राष्ट्रगान करण्यात आले व सर्वांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले व मिठाई वाटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वरोरा शहरातील अपरिचित हिरोज म्हणून कारगिल युद्धात उत्कृष्ट कामगिरी व कार्य केल्याबद्दल माजी सैनिक मधुकर मेश्राम यांचे अभाविप वरोरा शाखे तर्फे त्यांच्या घरी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सैनिकी जीवनातील मनोगत अनुभव कथन केले.अशाप्रकारे अभाविप वरोरा शाखेतर्फे वरोरा शहरातील 4 ठिकाणी प्रजासत्ताक दिन कोरोना नियमाचे पालन व मास्क व सॅनिटायझर चा वापर करत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी छकुली पोटे,सानिया पठाण, शकिल शेख, गणेश नक्षीने, लोकेश रुयारकर ,अंकित मोगरे, सौरभ साखरकर अथर्व गवळी,रावि शर्मा यांनी अथक परिश्रम घेतले.या वेळी सर्व अभाविप कार्यकर्ते व पूर्व कार्यकर्ता, शहरातील गणमान्य नागरिक, स्थानिक नगरसेवक, विविध सामाजिक संघटना, आदी नागरिक उपस्थित होते .
अभाविप वरोरा शाखेने या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी व नागरिक यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती ची जाणीव निर्माण केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close