ताज्या घडामोडी

कर्मचाऱ्यांच्या एकजुटीपुढे शासन झुकावेच लागेल …संतोष मडावी

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समितीची लाखणी येथे सभा

भंडारा:- आपण सातत्याने जुन्या पेन्शन संबंधात पाठपुरावा करीत आहोत.आंदोलने, मोर्चे, निदर्शने, दिंडी, धरणे देता संपूर्ण राज्यभरात पेन्शनचा मुद्दावर एकत्रित लढा सुरू आहे. यासाठीच पेन्शन संघर्ष यात्रा 22 नोव्हेंबर पासून सुरू झाली. जिल्ह्यात 7डिसेंबर ला दाखल होणार संघर्ष यात्रेत सर्वांनी सहभाग नोंदवावा. सर्व कर्मचारी तसेच संघटनेच्या वजमुठीसमोर शासनास झुकावेच लागेल. पेन्शन लढा यशस्वी होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समन्वयक समितीचे समन्वयक संतोष मडावी यांनी लाखणी येथील सभेत बोलत होते.

यावेळी मंचावर सभेच्या अध्यक्षस्थानी पेन्शन संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक संतोष मडावी ,कृषी संघटनेचे अजय खंडाईत,जुनी पेन्शन संघटनेचे अन्य विभागाचे प्रमुख विभागीय सचिव गोपाल मेश्राम,निर्मला भोंगाळे, शिक्षक परिषदेचे यादवराव गायकवाड ,आरोग्यसेविका संघटनेचे एस.एस. सावरकर, कमलेश बोराडे, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश सिंगनजुडे, कार्यवाह विनोद कींदले, प्रा. खा.अध्यक्ष रुपेश नागलवाडे, जुनी पेन्शन संघटनेचे सचिव परमेश्वर येनकिकर,महसूल विभागाचे टिकाराम चंदनबडवे, पंचायत समिती विभागाचे राजेंद्रकुमार कानडे,खाजगी प्राथमिक विभागाचे किशोर खंडाईत, खाजगी प्राथमिक माध्यमिक विभागाचे नामदेव ढवळे,नितीन धकाते, जि. प.प्राथमिक विभागाचे विवेक हजारे ,पशुसंवर्धन विभागाचे प्रवीण डोंगरे,उच्च माध्यमिक विभागाचे प्रशांत वंजारी, परिचर विभागाचे भागवत तिरपुडे, ग्रामसेवक संघटनेचे अमित चुटे, राजू ढवळे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकातून शिक्षण भरती संघटनेचे कार्यवाह विनोद किंदर्ले यांनी पेन्शन हा संविधानिक हक्क आहे. संविधानाच्या चाकोरीत राहुन लढा देत राहू असे सांगितले. संघर्ष यात्रेला लागणारा खर्च व संघटनेचा आर्थिक ताळेबंद सचिव परमेश्वर येनकीकर यांनी सादर केला. संचालन धनंजय टेकाम यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close