ताज्या घडामोडी

नेरी बाजारातील कचरा कुंडी ठरली शोभेची वस्तु

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

ग्रामपचायतीमार्फत बाजार चौकात कचरा गोळा करण्यासाठी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत पण त्यांचा वापर बाजारात कुणी व्यापारी व ग्राहक करतांना दिसत नाही. त्यामुळे कचरा कुंडीत न टाकता बाजारात ओट्यावर टाकून ठेवले जाते . त्यामुळे बाजारात दूसऱ्या दिवशी ग्रामपंचायत रोजदार व ट्रॅक्टर कचऱ्याची विल्हेवाट लावण्या करीता लागते ,यांवर दररोज होणारा खर्च अतिरिक्त आहे . त्यामुळे बाजारातील कचराकुंडी ही शोभेची वस्तू ठरली आहे ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन कचरा इतरत्र ओट्यावर न टाकता कचराकुंडीत गोळा होणार याकडे लक्ष द्यावे व होणारा अतिरिक्त खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष द्यावे अशी नेरीतील सुज्ञ नागरीकांची मागणी आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close