ताज्या घडामोडी

पल्स पोलिओ लसीकरण बालकांच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री…खासदार अशोक नेते

पल्स पोलीओ लसीकरण महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांनी बालकांना डोज पाजून शुभारंभ केला.

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

आज दि.०३ मार्च २०२४ रोज रविवारी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

खासदार अशोक नेते यांनी महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे बालकांना पोलिओ डोस पाजून शुभारंभ केला.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना पाच वर्षाखालील प्रत्येक बालकांना पोलिओ डोस दिला पाहिजे.बालकांचे जीवन सुदृढ व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिओ डोस आवश्यक आहे.
पल्स पोलिओ लसीकरण बालकांच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री आहे. बालकांना जीवनात अपंगत्व पोलिओ डोस न दिल्याने येऊ नये यासाठी भारतभर सगळीकडे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवीली जाते.याकरिता नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजावे.असे प्रतिपादन खा.नेते यांनी शुभारंभ याप्रसंगी केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम २०२४ गडचिरोली जिल्हयात आरोग्य विभागाचे ४२७ अधिकारी ५७४९ कर्मचारी यांचे मार्फतीने संपूर्ण जिल्हात राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम ग्रामीण क्षेत्रात ३ दिवसांकरिता व शहरी क्षेत्रात ५ दिवसांकरिता राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ‌दावल साळवे,डॉ. प्रफुल्ल हुलके,डॉ. माधुरी किलनाके,डॉ. हेमके,डॉ.धुर्वे, डॉ.पेंदाम तसेच आरोग्य कर्मचारी वृंद व महिला भगिनीं उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close