चिमुर नेरी रोडवर अपघात
एकाचा मृत्यु तीन गंभीर जखमी
प्रतिनिधी: सुदर्शन बावणे
दिनांक ८ / ३ / २४ रोजी सकाळी ०७.३० वाजता दरम्यान फिर्यादी बबन केशव घरत, वय ६० वर्षे, हे धनराज गोविंदा हनुमते यांचे सोबत मोटर सायकलने निमढेला गावावरून दोघेही नेरी तेथे मजुरांचे पैसे देण्याकरता जात होते. कळमगाव फाट्याजवळ जात असताना नेरी कडून येणारा एक नारंगी रंगाचा आयशर कंपनीचे ट्रक ने फिर्यादी चे मोटर सायकल समोर काही अंतर पुढे चालत असलेल्या मोटरसायकलला विरुद्ध बाजूला येवून कट मारून जखमी केले व त्याचा ट्रक पुन्हा रोडवर आणून फिर्यदीचे मोटरसायकलला धडक देवून घासत घेऊन बाजूचे शेतात ट्रक घेऊन गेला. मोटरसायकल चालक धनराज गोविंदा हनवते व फिर्यादी गंभीर जखमी झाले त्यामुळे धनराज हनवते चा मृत्यू झाला. अपघातातील वाहन क्रमांक एम एच 40 सीएम 287 व चालक नामे प्रफुल ईश्वर चौके वय पंचवीस वर्ष राहणार नवरगाव तालुका सिंदेवाही याला ताब्यात घेण्यात आले.
जखमी प्रशांत कवडूजी बुरडकर, ४५ वर्षे, रां हिंगणघाट व मनोहर शामराव कुंभारकर, ४६ वर्षे रा शिवनपायली यांना उपचार करिता सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले आहे.