ताज्या घडामोडी

आनंद निकेतन महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय ई कचरा दीन” साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा द्वारा संचालित आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्न आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा, यांच्या वतीने 14 ऑक्टोबर आंतरराषट्रीय ई कचरा दिन हा ‘पर्यावरण आरोग्य सुरक्षा समिती’  अंतर्गत महाविद्यालयात साजरा करण्यात आला. दिनाक. 14 ते 21  हा संपूर्ण सप्ताह  इ कचरा संकलन व जनजागृती   मोहीम  म्हणून राबविण्यात येत आहे. सदर मोहीम आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे आणि उपप्राचार्य राधा सावाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या निमित्ताने महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना ई कचरा संकलन बाबत  सविस्तर माहिती समजाऊन सांगितली व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना ई कचरा संकलन करण्या करिता प्रोत्साहित केले, ही मोहीम  प्रा. डॉ. संयोगिता वर्मा आणि विद्यार्थी आदित्य कडबे , जया आगलावे ,अदिती खेडूलकर ,विशाल चौधरी वर्ग  Bsc final yr (CBZ) आणि दीपा ठाकूर, मोनिका लांबट, सृष्टी जमगडे, प्रतीक्षा देठे, साक्षी ढवस वर्ग Bsc 2nd yr (CBZ) यांनी  दिवसेंदिवस वाढणाऱ्या ई कचऱ्याचे परिणाम ,मानवी आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परणाम, त्याची विल्हेवाट कशी लावावी,आपल्या महाविद्यालय ई कचरा संकलन का सुरू करण्यात आले, ई कचऱ्याच्या समस्येवरील उपाय योजना म्हणजे reduce reuse recycle ♻️ या त्रिसुत्रचा वापर करून ई कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मी मिळऊ शकतो, पण त्यासाठी हा ई कचरा एकत्रित पणे गोळा करणे गरजेचे आहे. या करिता आपल्या महाविद्यालय हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close