शांताबाई नखाते विद्यालय पाथरी दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2023 चा निकाल 94.92%.

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी संचालित शांताबाई नखाते माध्यमिक विद्यालय पाथरी, या विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. प्रस्तुत विद्यालयातून 197 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते, त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुण तसेच 21 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. 71 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर 53 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातून सर्वप्रथम कु. चैत्राली प्रदीप नवघरे 99.20% , सर्वद्वितीय कु. भक्ती नंदू चट्टे 99.00% तसेच सर्वतृतीय कु. विद्या उद्धव नवले 96.80% गुण घेऊन यश मिळवले आहे. वियालयातून 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उतीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.अनिलभाऊ नखाते साहेब, सचिव मा.भावनाताई नखाते मॕडम, संचालक मा. आदित्यभैय्या नखाते, संचालक मा.अजिंक्यभैय्या नखाते, गटशिक्षणाधिकारी मा. शिवाजीराव गितेसाहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. मुकेशजी राठोड साहेब, मुख्याध्यापक के. एन. डहाळे, मुख्याध्यापक एन. ई. यादव, उपमुख्याध्यापक आर. जे. गुंडेकर व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.