ताज्या घडामोडी

देशामध्ये विविध ठिकाणी आज सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

देशामध्ये विविध ठिकाणी आज सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याचे औचित्य साधून…
आज तूकाई मंगल कार्यालय येथे प.पू माधवानंद गुरु वामनानंद स्वामी यांच्या चालू असलेल्या चातुर्मास महोत्सवा मध्ये…
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समूह राष्ट्रगान चे आयोजन करण्यात आले..
स्वतंत्र दिन चिरायू हो जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत देशाचा तिरंगा मानाने फडकत राहो…
देव देश आणि धर्म यांच्या प्रतीक असणाऱ्या तिरंगा प्रति प्रत्येकाची समर्पित भावना असावी असे प्रतिपादन स्वामी माधवानंद महाराज यांनी केले..
समूहराष्ट्र गायनामध्ये स्वतः स्वामी माधवानंद महाराज उपस्थित होते..
जनगणमन व भारत माता की जय..
या जय घोषाने मंगल कार्यालय दणाणून गेले…
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर विविध शासकीय अधिकारी विविध शालेय शिक्षक विद्यार्थी प्रचंड नागरिक व शिष्य समुदाय उपस्थित होता…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिंतूर चातुर्मास समिती 2022 यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close