शहीद मिश्रा विधालयाच्या विद्यार्थीनी लगोरीत प्रथम विजयी

तालुका प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यातील शहीद मिश्रा विधालयात नुकत्याच झालेल्या लगोरी खेळा मध्ये वर्ग 9वा अ च्या विद्यार्थीनी नी लगोरी खेळ ण्या मध्ये प्रथम स्थान पटकावले.
प्राप्त माहिती नुसार वर्ग 9 वी अ च्या विद्यार्थीनी प्रथमतः वर्ग 9 वा ब च्या विद्यार्थीनी सोबत लगोरी खेळून विजयी झाले. त्यानंतर वर्ग 10 वी च्या विद्यार्थीनी सोबत फायनल खेळून प्रथम क्रमांकाने विजयी होऊन आपल्या वर्गा चा वर्चस्व कायम ठेवला.
या खेळा मध्ये सहभागी विद्यार्थीनी कु. प्लाक्षा नागदेवे. कु. माही पटले कु. चारु कटरे. कु. दिव्या रेवतकर, कु. राशी शेंडे, कु. तॣणाली बिसेन, कु. तॣप्ती मोरे यांनी लगोरी खेळात प्रथम क्रमांक पटकावुन आपल्या विद्यालयाचे नाव लौकिक करून या खेळाडु विद्यार्थीनी चे वर्ग शिक्षक गौरव जयस्वाल, शिक्षिका रंजना झरारीया यांनी विजयी मुलींना पुस्प गुच्छ देऊन सन्मान केला, या विजयी मुली ने आपल्या येशाचे श्रेय वर्ग शिक्षक गौरव जयस्वाल, शिक्षिका रंजना झरारीया यांना दिले
यांच्या विजयाचे शहरात व तालुक्यात कौतुक होत आहे.