ताज्या घडामोडी

पेंढरी कोकेवाडा येथील १८ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव

सिंदेवाही तालुक्यातील पेढरी-कोके, येथे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वताच्या घरीच  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  घडली आत्महतेचे कारण अजुन समजु शकले नाही मिळालेल्या माहितीनुसार म्रुतक अंकुश हा  सकाळी १० वाजता जेवन करुन घरीच होता मात्र आई वडील भाऊ कामाला गेले होते काही वेळाने आई घरी आल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे दिसुन आले  गावातील नागरीकांनी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे माहिती दिली ताबडतोब पोलीसांनी घटस्थळी पोहचुन पंचनामा करून शव  विच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला म्रुतक अंकुश भुजंगराव मगरे यांना आई वडील एक भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे या आत्महत्या मुळे पेंढरी गावात हळहळ व्यक्त होत आहे पुढील प्राथमिक तपास एयसआय-नेरलावार, गडकर ,नागरीकर मेजर करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close