ताज्या घडामोडी

भारतीय क्रांतिकारी संघटनेची तालुका बैठक संपन्न

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

भारतीय क्रांतिकारी संघटना तालुका शाखा नागभीड ची बैठक सभा भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा याचे मुख्य उपस्थितीत, महासचिव अजयभाऊ कोसे याचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे तालुका महासचिव अविनाश नवघडे, संजय रामटेके, परमेश्वर मडावी आपले मत व्यक्त केले. महासचिव अजयभाऊ कोसे यानीं अध्यक्षीय भाषणामध्ये संघटनेचे धोरण, उद्दिष्टे सांगून संघटनेला बळकट करण्यासाठी तन मन धनाने काम करा, असे प्रतिपादन केले. भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानीं तालुक्याचा आढावा घेतला. संघटनात्मक बांधणी करीता जास्तीत जास्त तरूणाना जोडून संघटन शक्ती मजबूत करावे असे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यानी केले. यावेळी नितेश देशमुख, अर्जुन यादव, कार्तिक,राहूल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close