नागभीड ग्रामीण रूग्णालयाची कंपाऊंड भिंत कोसळली

नवीन बांधकाम करण्याची तिथे वास्तव्याने राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मागणी
ग्रामीण प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे मिंडळा ता. नागभीड
नागभीड ग्रामीण रूग्णालयातील कंपाउंड भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे या कडे संबंधित विभागाने लक्ष देऊन त्या ठिकाणी कंपाऊन भिंतीचा नवीन बांधकाम करावे अशी मागणी तेथील वास्तव्याने राहणारे कर्मचाऱ्यांनी केली आहे ,
ग्रामीण रूग्णालयातील ३० वर्ष जुनी कंपाऊंड भिंत कोसळली आहे . सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या परिसरात साप विंचू आत येण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे तिथे दुर्दैवी घटना घडण्यास नाकारता येत नाही , रूग्णालयाच्या परिसरात जंगली डुकरे व गावटी डुकरे वास्तव्य करून घाणिचे साम्राज्य तयार होत आहे.
संबंधित विभागाने त्या ठिकाणी नवीन कंपाऊंड भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर करावे अशी मागणी तेथील वास्तव्याने राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे ,