राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची जळकोट तालुका कार्यकारिणी जाहीर
जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजयजी बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड मोहम्मदखॉ पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रशिद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जळकोट तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी यांनी जळकोट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते नयुम कोतवाल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या जळकोट शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. तसेच तालुका कार्याध्यक्षपदी अयुब शेख _ अतनूर, उपाध्यक्षपदी फय्याज मुल्ला – पाटोदा ( बु ), सचिवपदी चौधरी युनूस ( सोनवळा ), शेख हसन (होकर्णा ), कोषाध्यक्षपदी दस्तगीर शेख, सहसचिव ईस्माईल पठाण – (चेरा ) सरचिटणीसपदी पाशा पटेल ( मरसांगवी ) संघटक पदी शरीफ शेख (होकर्णा ) यांची निवड करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी कामगार विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष सलीम बागवान अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हुजूर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे,फयुम बागवान, दिलदार पटेल , हसन शेख आदी उपस्थित होते .