ताज्या घडामोडी

अनुराग चांदेकर याची जवाहर नवोदय विद्यालय निवड

ग्रामीण प्रतिनिधी: राहुल गहुकर नेरी


जनता विद्यालय नेरी नवोदय विद्यालयात यशाची परंपरा कायम


लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी द्वारा संचालित जनता विद्यालय नेरीचा इयत्ता 5 विचा विद्यार्थी अनुराग संजय चांदेकर याची जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे.
नेहमीप्रमाणे जनता विद्यालय नेरीने जवाहर नवोदय विद्यालयात यशाची परंपरा कायम ठेवली. दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी या परीक्षेत पात्र होत आहेत.
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी चे पदाधिकारी तथा संचालक, जनता विद्यालय नेरीचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. येरणे, नवोदय प्रमुख श्री. एस. पी. पंधरे तसेच सर्व कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
अनुरागने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक यांना दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close