आदिवासी माना जमातींचा मोठा सण नागदिवाळी नेरीत संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नाग दिवाळी हा माना जमातीचा मुख्य सण असून या कार्यक्रमाचे आयोजन करून जमातीतील लोकांना जमाती विषयी माहिती देऊन आपले संविधानिक हक्क काय हे सांगून समाज जागृत करण्याचे काम या जमातीतील आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना करत आहे. याचाच भाग म्हणून चिमूर तालुक्यातील नेरी येथे आदिवासी माना जमात मंडळाच्या वतीने एक दिवसीय नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. सर्वात प्रथम मुठ पूजा करून आराध्य देवी मां माणिका देवीची पूजा-अर्चा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहाटे स्वच्छता अभियान राबविण्यात आले . वेळी गावकर्यांनी विशेष करून महिलांनी आपल्या घरासमोरील रस्ते स्वच्छ करून तिथे रांगोळ्या काढले होते. कोरणा चा वाढता प्रादुर्भाव बघता गावातून मिरवणूक न काढता भजन पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात महिला, पुरुष ,युवक, युवती ,बालगोपाल यांनी भाग घेतला होता. यानंतर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नाना दडमल (ग्रामपंचायत सदस्य नेरी) यांनी समाजातील प्रगती आणि शैक्षणिक समस्या यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मानाजमात समाजातील तरुण मंडळी, बालगोपाल ,महिलावर्ग, अबालवृद्ध यांचे मोलाचे सहकार्य लाभले.