जागतिक महिला दिनी प्रा. छाया बोरकर यांच्यासह अनेकांचा सत्कार
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आनंद बुद्ध विहार अर्जुनी मोरगांव येथे जागतिक महिला दिनानिमित्त आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, तथा साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या आयोजित कार्यक्रमात सहज सुचलंच्या प्रा. छाया बोरकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध , घटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य डाॅ .बाबासाहेब आंबेडकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नितेश दादा क्षिरसागर यांनी विभुषित केले होते तर प्रमुख अतिथी म्हणून शारदा बडोले , पौर्णिमा शहारे ,महादेव लिचडे (पवनी) हंसराज खोब्रागडे तसेच केवलचंद शहारे उपस्थित होते.
प्रा. डॉ. कल्पना सांगाडे व चंदू डोंगरवार यांनी या कार्यक्रमात उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.अतिशय थाटात व उत्साहात हा सत्कार सोहळा पार पडला.
उपरोक्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. कल्पना सांगाडे यांनी केले . महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून अनेक उच्चपद त्यांनी विभूषित केलेले आहे त्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मला खूप अभिमान वाटतो. जबाबदाऱ्या सांभाळत त्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्व क्षेत्रात उमटवित आहे. या सर्वांचा सत्कार करावा. अशी ब-याच दिवसांपासून आपली मनोमन इच्छा होती. ती आज पूर्ण झाली याचे मला सात्विक समाधान वाटते. असे त्या आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाल्या . आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून त्याच्या कार्याचा आपण सन्मान करायला पाहिजे .कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. असे प्रतिपादन क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून केले .
सामाजिक कर्यात काम करणांऱ्या व आपल्या कर्तृत्ववाचा ठसा उमटविणारे ममता पवार , सपना उपवंशी शिला उके या शिवाय सामाजिक व राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणारे माजी आ. राजकुमार बडोले . शारदा बडोले यांचा शाल व जागर मराठीचा विशेषअंक देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी हंसराज खोबरागडे, प्रतिभा रामटेके, वनिता लीचडे, श्वेता क्षिरसागर, पौर्णिमा शहारे, प्रा.कल्पना सांगाडे, अर्चना ईकने ,चंदू डोंगरावर ,केवलचंद शहारे, तारका रुखमोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे सुरेख सुत्र संचालन सुधा मेश्राम यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार मीनाक्षी सांगोडे यांनी मानले.