ब्रम्हपुरी यथे मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ‘जन आक्रोश महामोर्चा

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे
आज दिनांक 6 ऑगस्ट 2026ला ब्रम्हपुरी येथे कांग्रेस विधिमंडळ नेते तथा मा. आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, शेतमजूरांचा ब्रम्हपुरी तहसील कार्यालयावर जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. दुपारला 12 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगण ते तहसील कार्यालय ब्रम्हपुरी इथपर्यंत काढण्यात आला.

या मोर्चाच्या म्हणण्यानुसार जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, 2025-26 वर्षातील धनाचा बोनस, स्मार्ट मीटर योजना बंद, गोसिखुर्द प्रकल्पचे बारमाही सिंचन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे थकीत मानधन, महागाई नियंत्रण,रोजगारनिर्मिती व महिलांच्या सुरक्षेसह विविध मागण्या करण्यात आल्या.
ब्रम्हपुरी मतदारसंघातील नागरिकांच्या न्यायासाठी कांग्रेस च्या वतीने ‘जन आक्रोश महामोर्चा’ काढून शेतकरी, महिला व विद्यार्थी यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. हजारो संख्येने नागरिकांनी उपस्थिती देऊन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. सरकार त्यांच्याकडे लक्ष देतो की नाही हे समोर पाहण्यासारख राहील.
या ‘जन आक्रोश महामोर्चात’ युवक काँग्रेस सरचिटणीस शिवणीताई वडेट्टीवार, काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके,काँग्रेस शहरअध्यक्ष हितेंद्र राऊत,नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, सोनू नाकतोडे,प्रभाकर सेलोकर,राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर यांच्यासह हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांना उपस्थित होते.









