ब्रम्हपुरीच्या न्यायहक्का साठी शिवसेनेचे साखळी उपोषण सुरु

20 एप्रिल पासून आमरण उपोषण करणार :- नरेंद्र नरड तालुका प्रमुख ब्रम्हपुरी
तालुका प्रतिनिधी :सनम टेंभुर्णे
शिवसेना तालुका व शहर ब्रम्हपुरी च्या वतीने नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारा विरोधात साखळी उपोषण नगरपरिषद च्या मुख्य द्वारात सुरु आहे. नगरपरिषद येथील मुख्याधिकारी यांना तोंडी तसेच लेखी अनेक निवेदन सादर केले असताना सुद्धा त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शिवसेनेच्या वतीने हा पाउल उचलला आहे. त्या साखळी आंदोलनात काही मुख्य आरोप करण्यात आले आहे ते म्हणजे मागणी
1)30/3/26 रोजी झालेल्या नियम बाह्य आठवडी बाजार, दैनिक बाजार लिलावातील कंत्राट दार हा फुटपाथ तसेच अन्य व्यापार वर्गा कडून 20,30 रुपये रोज च वसूल करीत आहे ती वसुली थांबवून त्या फुटपाथ धारकांना न्याय मिळावा व त्या कंत्राट दाराचे करार तात्काळ रद्द करावा
2)नगर परिषद ब्रम्हपुरी येथील गैरअर्जदार नगरसेवक /सदस्याचे अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवा
3)ब्रम्हपुरी शहरातील कॅन्सर सारख्या आजार ची संख्या झपाट्याने वाढत असताना सुद्धा ब्रम्हपुरी शहरात विना परवानगी ने बेकायदेशीर टॉवर उभारण्यात आलेले आहेत ते टॉवर तात्काळ काढण्यात यावे
4)भूमिगत गटर योजनेचे काम सुरु असताना त्यात येणाऱ्या व भविष्यात फोडल्या जाणाऱ्या रस्ता बांधकामचा कंत्राट तात्काळ रद्द करा.9/10/24 रोजी भूमिगत गटर योजने चे कामाची सुरवात झालेली असून 9/4/26 ला करारतील मुदत संपली असताना सुद्धा ब्रम्हपुरी शहरातील काम संथ गतीने सुरु आहे ते च काम पूर्ण न करता फक्त कमिशन साठी नवीन त्याच रोड च करार काढण्यात आला असा स्पस्ट आरोप करत वरील करार तात्काळ रद्द करा अशी मागणी केलेली आहे
5) ब्रम्हपुरी शहरातील स्मशान भूमी याचा तात्काळ विस्तुरीकरण व सौंदर्यकरण करण्यात यावे
6) सफाई कामगार प्रभाग निहाय 5 देण्यात यावे तसेच नगरपरिषद येथील कामगारांची संख्या कमी असल्याने त्यांना मदती साठी सफाई कामगार म्हणून नेमणूक झालेले कर्मचारी हे कधीच सफाई करताना दिसलें नाही जर पैस्या अभावी माणसे कमी पडत असतील तर ज्यांची नेमणूक च सफाई कामगार म्हणून झाले त्यांनी आपले कर्तव्य निभवने गरजेचे आहे करीत सर्व नियमित व कंत्राटी या सफाई कामगार यांनी प्रभाग निहाय 5 कामगारांची नियोजन करावे
.
7) नगर परिषद अंतर्गत कंत्राटी कामगार (घनकचरा, नाली, गार्डन, पाणीपुरवठा, कॉम्पुटर ऑपरेटर इत्यादी ) सर्व कामगारांचे किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे. मिळालेल्या माहिती नुसार वरील सर्व कंत्राट दार 270,300,350 रुपये रोज देत असून त्यांचा नावाने किमान वेतन नुसार 700 रुपया पेक्षा जास्त राखमेचे उचल करत आहे तरी सर्व कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन देण्यात यावे. श्री साई भूसंपदा कृषी उदयोग खापा ता सावनर यांनी 2023 ते आज पर्यंत सर्व कामगारांच्या नावाने लाखो रुपये उचल केली आहे व त्या कामगारांना फक्त 6500 मासिक देऊन काम करून घेतले आहे म्हणून अश्या कंत्राटदाराचे करार तात्काळ रद्द करा अशी मागणी केले ली आहे. ह्या मागण्या 14/4/26 पर्यंत पूर्ण न झाल्यास 20/4/26 पासून आमरण उपोषण सुद्धा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. या उपोक्षणासाठी शिवसेनाच्या वतीने मा संजय पारटवार उपजिल्हा प्रमुख, मा नरेंद्र नरड तालुका प्रमुख, कवळू पिंपळकर उपतालुका प्रमुख, आशिष गांडलेवार उप शहर प्रमुख, आकाश शेंद्रे युवा सेना तालुका प्रमुख, गणेश लांजेवार, व इतर शिवसैनिक उपस्थित आहेत









