ताज्या घडामोडी

स्व. गीता मेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने ३६ युवकांनी केले रक्तदान

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

दिनांक19 जुलै 2021 रोज सोमवार ला स्व.गीता गोपाल मेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन कर्मवीर वार्ड वरोरा येथे सकाळी 8.30 ते 3 वाजेपावेतो करण्यात आले .शिबिराची सुरुवात छत्रपती शिवराय ,स्वामी विवेकानंद तथा स्व.गीता मेले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली.शिबिराचे उदघाटन दै.नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी मनिषजी भुसारी यांचे हस्ते करण्यात आले.शिबिराला 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदानासाठी श्री साईनाथ ब्लड बँक सेंटर,सक्करधरा नागपूर यांचे तर्फे सहकार्य करण्यात आले.रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन व शिवशाही युवा मंच तर्फे करण्यात आले .शिबिराला शहरातील अनेक गणमान्य नागरिकांनी भेट देऊन आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close