ताज्या घडामोडी

सात ऑगस्टला ‘मंडल यात्रा’ ओबीसी जाणागणेसाठी ब्रम्हपुरी येणार

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे

मंडल दिनानिमित्त शुक्रवार 7 ऑगस्ट ला ओबीसी समाजाजी स्वातंत्र्य जातीनिहाय जणगणना झाली पाहिजे या मागणी ला बाळ देण्याकरिता दाखल होणार आहे. या यात्रेकारिता भव्य बाईक रॅली, स्वागत सोहळा आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकल ओबीसी महामोर्चा चे संयोजक उमेश कोर्राम यांच्या नेतृत्वात 11 जिल्ह्यामध्ये 3 ते 9 ऑगस्ट ला जणजागार यात्रेचे नियोजन आहे. ओबीसी ची स्वतंत्र नतिनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीकरिता समाजात जागरूकता निर्माण झाली पाहिजे

या प्रमुख उद्देशाने ही यात्रा काढण्यात येत आहे. महामोर्चाचा म्हणण्यानुसार सरकारकडे ओबीसी ची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना तसेच स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना, महाज्योती संस्थेला वाढीव निधी, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी भवन आणि कार्यालय, विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती, रिक्त पदे भरण्यात यावी, लोकसंख्येनुसार अर्थसांकल्पीय निधी, उद्योगासाठी आर्थिक साहाय्य, प्रत्येक तालुक्यात वसतिगृहे, परदेशी शिष्यवृत्ती आणि शेतकरी साठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यासारख्या विविध मागण्या महामोर्चाने केल्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close