ताज्या घडामोडी

औंढा नागनाथ येथे झालेल्या रॉबरी प्रकरणातील दोन संशयित आरोपी ताब्यात

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी MP-10 ZJ-8382 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने पुण्याकडे जात असल्याचं समजताच पाथरी पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.


बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ट्रॅव्हल्स अडवून तपासणी केली असता दोन संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे—
गणपत प्रभाकर कीर्तने, वय 27 वर्षे, रा. असोला, जि. हिंगोली.
आदिनाथ ज्ञानोबा कदम, वय 22 वर्षे, रा. गुंडा, ता. वसमत, जि. हिंगोली.
पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांवर खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर औंढा नागनाथ पोलिसांचे PSI श्रीधर वाघमारे यांच्या ताब्यात दोन्ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी देण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, एचसी मन्नू शेख, एचसी आढाव आणि पीसी नसीर शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close