ताज्या घडामोडी

केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात पाथरी युवा काँग्रेसचा महामोर्चा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आणि नीट (NEET) परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आज पाथरी शहर युवा काँग्रेसच्या वतीने एक विशाल महामोर्चा काढण्यात आला.हा महामोर्चा पाथरी येथील चौक बाजारपासून ते तहसील कार्यालयपर्यंत काढण्यात आला.
​देशात झालेल्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे आणि या नैराश्यातून २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.प्रशासनाच्या वतीने पाथरीचे तहसीलदार यांनी आंदोलकांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

​या महामोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, नागसेन धेरजे,जुनैद खान दुर्राणी,तारेख दुर्राणी,सलमान शेख, आकेफ खान,वैजेनाथ महिपाल,शहर अध्यक्ष दादाराव गवारे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी,सर्व सन्माननीय नगरसेवक आणि हजारोच्या संख्येने विद्यार्थी व युवक मोठ्या सहभागाने उपस्थित होते.यावेळी मोर्चात सामील युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close