धारीवाल इंफास्टॅक्चर लिमिटेड तर्फ चंद्रपूर येथे महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुुर
धारीवाल इंफास्टक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपरपज सोसायटी चंद्रपूर तर्फे बचत गटातील महिलांचा दिनांक 31मार्च 2021 ला एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.या प्रशिक्षणात किसान मित्र संस्था नेरी ता. चिमूर तर्फ मा.पुरुषोत्तम वाळके व किशोर पोहीणकर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना 1)वॉशिंग पावडर 2)फीनाईल 3)परफ्युम सेंट 4)हँड वॉश लिक्विड 5)डिशवॉश लिक्विड 6)टायलेट क्लीनर 7)ग्लास क्लीनर या व्यवसायाचे प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण देण्यात आले जे साहित्य बनविले ते टेस्ट केल्या नंतर उत्तम दर्जाचे निर्माण झाले.. गुरुदत्त अपार्टमेंट पहेल सोसायटी चंद्रपूर येथे उद्योग प्रशिक्षण पुरुषोत्तम वाळके किसान मित्र संस्था नेरी यांनी उपस्थित महिला प्रशिक्षणार्थीना 7 व्यवसायाचे प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक, गटचर्चा, कृती पर प्रात्याक्षिक या माध्यमातून प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणाला चंद्रपूर परिसरातील मोरवा, सोनेगाव,पडोली,ताडाली येथील 50 महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या या प्रशिक्षणाचे आयोजन अंजु काकडे यांनी केले . 7 उद्योगाचे साहित्य व मटेरियल किट्स व प्रशिक्षणा करीता सम्पर्क:-:- पुरुषोत्तम वाळके नेरी मोबा.9421707602