ताज्या घडामोडी

यंगिस्तान का हिंदुस्तान: Gen Z च्या उद्रेकाची सुरुवात

-प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे

6 जून च्या दिल्लीतील जंतर-मंतर येथील देशभरातील विविध भागातील हजारो युवक-युवती यांचा सरकारी संस्थाने व विकाऊ मीडिया यांच्याबद्दल उद्रेक प्रत्यक्षात बघायला मिळाला.

तरूणाई फक्त सोशल मीडियावरच ऍक्टिव्ह असते आणि वास्तव्यासोबत त्यांचं काहीच घेणं-देणं नाही हा समज खोटा आहे याची पूर्ण खात्री पटली. कॉकरोच जनता पार्टी ही Gen Z ची सध्याच्या राजकीय व्यवस्थेविरोधात उभी राहिलेली राष्ट्रीय चळवळ आहे.

20-22 वर्षाची पोरं पत्रकारांना खूप जबाबदारी ने उत्तरे देत होती, चीड होती पण संयमही खूप होता. सुरुवातीला लोकं जमायला वेळ लागला कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातून रेल्वे, बस, जे मिळेल त्या वाहनाचा आधार घेऊन भर उन्हात घामाजलेल्या अवस्थेत आपला आक्रोश मांडण्यासाठी पोहचत होते. सात हजाराच्यावर Gen Z पोहचले होते, यात विद्यार्थाचे आई वडील, आजोबा स्वतःला ‘कॉकरोच’ म्हणून संबोधत होते.

विकाऊ पत्रकार दिसताच त्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजीची सुरुवात झाली. या विरोधामुळे काही पत्रकारांनी सर्वांसमोरच पळ काढावा लागला.

आंदोलनाला गालबोट लावावे म्हणून मुद्दाम दाखिल झालेल्या काही ‘प्रोत्साहित’ तत्वांची या 20-22 वर्षाच्या युवक-युवतींनी चांगलीच ‘मजा’ घेतली, यामुळे यांनाही पळ काढावा लागला.

हे आंदोलन करणारे Gen Z शिक्षित, संस्कारी आणि समजदार आहेत. आपल्यावर झालेला अन्यायाविरोधात आपले मुद्दे प्रखरपणे ठोसून सांगू शकतात. पत्रकार परिषद घेऊ शकतात. देशाला नवी दिशा देऊ शकतात. यांच्या तरुणाई चा हिंसक उद्रेक होऊ नये व आपली बांगलादेश, नेपाळ सारखी अवस्था होऊ नये म्हणून सरकारने वेळीच परमिशन देणे व पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित होते.

या आंदोलनात समजले की नवीन भारताची निर्मिती ही नवीन पिढी करण्यास सक्षम आहे. यंगिस्तान चा हिंदुस्थान आकार घेत आहे. Gen Z ला शुभेच्छा💐💐💐

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close