ताज्या घडामोडी

मानवतेचे दर्शन! दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी तहसीलदार स्वतःपायरीवर बसले

“सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव”

मानवत येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी आज दिनांक 17 जुलै 2026 रोजी एक नविन काहीतरी पाहण्यास मिळाले एक अधिकारी चक्क एका अपंग व्यक्तीसाठी स्वतः पायरीवर बसून त्याची समस्या जाणून घेतल्या.


प्रशासकीय अधिकारी म्हटलं की सामान्य माणसाच्या मनात एक जरब आणि अंतर असते. मात्र, मानवत येथील तहसील कार्यालयात नुकताच या समजाला छेद देणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा एक संवेदनशील प्रसंग पाहायला मिळाला. शासकीय कामासाठी आलेल्या एका दिव्यांग वृद्धाला त्रास होऊ नये म्हणून स्वतः मानवतचे तहसीलदार आपल्या खुर्चीवरून उठून खाली आले आणि चक्क पायरीवर बसून त्यांनी त्या वृद्धाचे प्रश्न समजून घेत मदत केली.


​तहसीलदारांच्या या अत्यंत संवेदनशील आणि मानवतावादी कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
​नेमकं काय घडलं?
​मिळालेल्या माहितीनुसार, मानवत येथील तहसील कार्यालयात एक दिव्यांग वृद्ध व्यक्ती आपले शासकीय काम घेऊन आले होते. दोन्ही पायांनी चालण्यास असमर्थ असलेल्या या दिव्यांग वृद्धाला तहसीलदारांच्या दालनापर्यंत जाणे कठीण होते. ही बाब लक्षात येताच, मानवतच्या तहसीलदारांनी कोणताही बडेजाव न बाळगता तात्काळ आपले दालन सोडले.
​ते थेट कार्यालयाबाहेर असलेल्या पायऱ्यांवर आले, जिथे तो दिव्यांग वृद्ध बसला होता. अधिकाऱ्याने त्या वृद्धाजवळ जात त्याचे कागदपत्रे तपासली. केवळ उभे राहूनच नव्हे, तर त्या वृद्धाला सोयीचे व्हावे म्हणून तहसीलदार स्वतः तेथील पायरीवर बसले आणि अगदी आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे काम मार्गी लावले.
​सोशल मीडियावर कौतुकाचा पूर
​या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ कार्यालयातील उपस्थित नागरिकांपैकी कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. “मानवत तहसीलदारांकडून मानवतेचे दर्शन…” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि पाहता पाहता तो सर्वत्र व्हायरल झाला.
​”अधिकारी असावा तर असा!” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तहसीलदारांच्या या साधेपणाचे आणि संवेदनशीलतेचे मनापासून कौतुक केले आहे. प्रशासकीय सेवेत राहूनही सामान्यांप्रती असलेली ही संवेदनशीलता आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close