नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील जवळच असलेल्या नेरी गावात आज दि. 18 मे 2026 ला गुरुदेव वार्ड खाती मोहल्ला नेरी येथील रहिवासी रुपेश गोकुळदास शेंडे (वय 32 वर्ष)यांनी आपल्या स्वतःच्या राहते घरी छताच्या पंख्याला बारीक दोरीच्या साह्याने लटकून आत्महत्या केली.
मृतक हा अविवाहित असून काही महिन्याच्या अगोदर कॅन्सरने त्याच्या आईचे निधन झाले होते. तेव्हापासून तो अधिकाधिक नैराश्येत जाऊन त्याचे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. आज सकाळी अंदाजे सात वाजताच्या दरम्यान घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्याने आत्महत्या केली. मृत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून तीन विवाहित बहिणी आहेत. घरी मुतक व वडील दोघेच राहत होते.मृतकाचे वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळे घरी कोणीही नव्हते. आज सकाळी फिरून आल्यावर त्यांनी आत्महत्या केली. शवविच्छेदनासाठी
ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठवण्यात आले आहे पुढील तपास चिमुर पोलीस करत आहेत









