ताज्या घडामोडी
नागभीड रोड सायघाटा ला पुन्हा ट्रक पलटी

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी ते नागभीड रोड मध्ये सायघाटा जंगल येथून जाणाऱ्या रोड वर काही दिवसापासून KCC कंपनी चे काम सुरु आहे. त्यामुळे त्यांनी काही diversion रस्ता बनवून दिलेला आहे. परंतु त्या diversion रोड ने जात असताना नेहमी ट्रक किंवा बुलडोझर रस्त्याच्या कडेला घसरून पडताना दिसत आहे. असेच काल रस्त्याने जात असताना MH 40 BL9285 क्रमांकाचा ट्रक पटली खाल्लेली दिसला. ट्रक मध्ये खताचे कट्टे असल्याची प्राथमिक स्तरातून माहिती मिळाली. अपघातात जीवित हानी बद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही.यापूर्वी सुद्धा बस त्याच ठिकाणी पालटलेली होती. अशे प्रकार वारंवार घडत आहेत. नागरिकांची विनंती आहे कि याकडे प्रशासनाने लवकर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. रोड तपासून त्यावर तोडगा काढावा अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे. क









