चिमुर येथे आबादी वार्डात राहणाऱ्या वयोवृध्द महिलेस लुटले
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमुर येथील आबादी वार्डात राहणारी श्रीमती शेवंता तुकाराम हिंगणकर हि वयोवृध्द असुन तिचे पती व मुलगी मरण पावल्याने घरात एकटीच वास्तव्यास आहे. तिची अचानक तब्बेत खराब झाल्यास शेजाऱ्यांना किंवा बाजुच्या भाडेकरुंना घरात प्रवेश करण्यास सुलभ जावे म्हणुन ती रात्रोचे वेळी समोरील खोलीच्या दरवाज्याची कडी न लावता दरवाज्याला 15 लिटरची पाणी भरलेली कॅन व लाकडी स्टुल टेकवुन ठेवत होती. दिनांक 13/01/2023 रोजी फिर्यादी हि नेहमीप्रमाणे जेवण करुन रात्रो 08/00 वाजताचे सुमारास घरातील पहिल्या खोलीत झोपली असतांना दिनांक 14/01/2023 रोजी रात्रोला 01/30 वाजताचे पुर्वी तिला दरवाज्यास टेकवुन ठेवलेला स्टुल पडल्याचा आवाज आल्याने फिर्यादीस जाग आली. त्यानंतर अनोळखी दोन ईसमांनी संपुर्ण चेहऱ्याला दुप्पटा बांधुन फिर्यादीच्या घरात प्रवेश केला व त्यांचेपैकी एकाने ” तु, चुप राहा, नाहीतर तुला मारतो” अशी धमकी देवुन घरातील लाईट सुरु केला. त्याला फिर्यादीच्या गळयात सोन्याची गोफ दिसल्याने स्वत:च्या पॅन्टचे खिशातुन चाकु काढुन चाकुच्या सहाय्याने फिर्यादीच्या गळयातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याचा गोफ किंमत 30,000 रुपयाची जबरदस्तीने कापुन चोरुन नेली. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरुन पो.स्टे. चिमुर येथे अप क्र. 12/2023 कलम 451, 392, 506, 34 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी अतिरिक्त कार्यभार चिमुर तसेच श्री. मनोज गभने, पोलीस निरीक्षक पो.स्टे. चिमुर यांचे मार्गदर्शनात पो.उपनि. भिष्मराज सोरते, पोलीस नायक कैलास आलाम, पोलीस अंमलदार सचिन खामनकर, शैलेश मडावी, सचिन साठे गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.