बोरगव्हाण येथील माजी सरपंच परमेश्वर इंगळे,सूरेश ईंगळे ,रामभाऊ ईंगळे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील माजी सरपंच परमेश्वर इंगळे, सुरेश इंगळे, तसेच रामभाऊ इंगळे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश करत स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण केली आहेत. हा प्रवेश सोहळा शिवसेना भवन येथे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, माजी सभापती सदाशिव थोरात, तसेच अशोक गिराम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बोलताना ग्रामीण भागात शिवसेना वाढवण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पस्ट केले .ग्रामीण विकास विकास हेच आपले प्रमुख ध्येय असुन गावागावातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले .
नव्या नेतृत्वाच्या विश्वासावर आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी सरपंच परमेश्वर इंगळे यांनी यावेळी सांगितले. पुढील काळात पक्ष संघटन मजबूत करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या माध्यमातून पक्षाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक पातळीवर या प्रवेशामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने याकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.या कार्यक्रमास कृष्णा ईंगळे ,सिताराम ईंगळे ,हरिभाऊ ईंगळे ,छत्रभुज खुडे ,तुकाराम धोतरे ,वैजनाथ ईंगळे ,माऊली ईगळे ,नागनाथ कदम आदि ऊपस्थीत होते . एकूणच, बोरगव्हाण येथील या राजकीय घडामोडीमुळे पाथरी तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाल्याचे चित्र आहे.








