ताज्या घडामोडी

उमेदच्य मार्गदर्शनात माही अक्वा सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न

दि. 30 मार्च, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, समता महिला प्रभाग संघ खडसंगी यांचे आर्थिक सहायाने मौजा सावरी ( बीड.) येथील नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अक्वा सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अर्चना बोनसुले तालुका अभियान व्यवस्थापक यांचे हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या नव्या अक्वा सेंटरमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची अत्याधुनिक यंत्रणा, जलशुद्धीकरण प्रणाली तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी सहज उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन समारंभाला सरपंच लोकनाथ रामटेके, सुरेश धारने प्र. सहा. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, वंदना गुढधे प्रभागसंघ अध्यक्ष, संगीता मेश्राम प्रभागसंघ सचिव, पुंडलीक गेडाम clm, शीतल थुटे clfm तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार भरती सातपैसे पशुसखी यांनी मानले आणि सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close