ईएसएल कंपनीचा शिक्षणाला हातभार; पोहेटाकळी जिल्हा परिषद शाळेला १५० स्वाध्याय पुस्तिका व एलईडी टीव्ही संचाची भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने ईएसएल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १५० उत्कृष्ट दर्जाच्या स्वाध्याय पुस्तिका आणि एक एलईडी टीव्ही संच भेट देण्यात आला. या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
यावेळी ईएसएल कंपनीचे प्रतिनिधी श्री. बालासाहेब आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी उपयुक्त ठरणारा एलईडी टीव्ही संच शाळेला सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमाला गावचे सरपंच शामराव गोंगे, उपसरपंच गणेशराव बागल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम गोंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबासाहेब गोंगे, पोलीस पाटील राहुल घुगे, शाळेचे मुख्याध्यापक अंभुरे , केदारे तसेच विशेष उपस्थिती म्हणून डॉ. संतोष देवा केदारे उपस्थित होते.
ईएसएल कंपनीकडून बालासाहेब आव्हाड, अशोक पामे, भास्कर शेटे, संतोष जगताप, महेश घाटूळ, गोविंद रोकडे आणि विष्णू थोरात यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोडे यांनी केले, तर कदम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिसे , निर्मळ आणि शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईएसएल कंपनीच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत, स्वाध्याय पुस्तिका आणि डिजिटल शिक्षणासाठी मिळालेला टीव्ही संच विद्यार्थ्यांच्या अध्ययनात निश्चितच मोलाची भर घालेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी ईएसएल कंपनीचे या सामाजिक बांधिलकीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.









