ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने मानवत येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील मस्जिद हॉल येथे ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन दि.13 सप्टेंबर शुक्रवार रोजी करण्यात आले होते.या शिबीरा मध्ये 116 लोकांनी रक्तदान केले.
या शिबिराला मानवत नगर परिषद चे मुख्याधिकारी कोमल सावरे, मानवत नगर परिषद चे नगर अभियंता सय्यद अन्वर, मानवत पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, मानवत पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटिल यांनी भेट दिली..
या वेळी युथ मुव्हमेंट चे पदाधिकारी सय्यद समीर, मोहम्मद सलीम सर बागवान, नजात खान पठाण, माजी नगरसेवक नियामत खान, महोम्मद मुस्ताक, गुफरान बागवान, अब्दुल रशिद बागवान, शगिर खान, इद्रिस बागवान, महोम्मद रफिक बागवान, फय्युम बागवान, कलिम खान, शेख समीर, सय्यद सरफराज, सय्यद एकबाल, फयाज अन्सारी, पत्रकार बंधु व इतर मान्यवर उपस्थित होते.या शिबिराला यशस्वी करण्यासाठी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले..