ताज्या घडामोडी

रमाईच्या त्यागामूळे भारतिय महीलाचे जिवन बदलले-प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई जिवनसंगीनी नव्हे तर मातृत्वाची जबाबदारी ताकतीने स्वत ऐकटीने पेलनार्या मातृत्वाचा सारांश होय स्वताच्या आयुश्याला दारीद्राच्या अग्नीमध्ये जाळताणा अथांग दुखाचे भांडवल कधीच केले नाही रमाईच्या त्यागामुळे आज भारतीय महिलाचे संपुर्ण जिवनच बदलले आहे अनेक पिढ्याचे जिवन प्रकाशमान झाले असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी महामुनी बुद्ध विहार नेरी येथे रमाई जयंतीनिमित्त रमाईची जिवनगाथा यावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष छबीला टेंभुर्णे ह्या होत्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रत्नमाला सहारे शालीनी साखरे,हर्षा ढवळे ,विना राउत,विलास राऊत होते पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की जगातिल सर्व महीलासाठी रमाई महीला सश्कतीकरनाच्या प्रतिक प्रेरणा आहेत तेव्हा सरकारनी रमाईचे चरित्र अभ्यासक्रमात आनावे
क्रांतीला त्यागाची गरज असते बाबासाहेबाच्या समतेच्या क्रांतीला सफल करनारा सर्वात मोठा त्याग रमाईचा बाबासाहेबानी मिळवलेल्या पदव्या रमाईच्या अफाट त्यागाचे प्रतिबिम्ब होय आर्थीक वीवचनेतुन औषधाविना पोटची मुले गमाविली जगात येवढे मोठे दुख कधीच कुठल्याही महिलाच्या वाट्याला आले नाही रमाईच्या कणखर मनोबलाची अनमोल साथ देशातिल तमाम वंचित उपेकक्षित पिडीताच्या जिवनाच्या उधारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मीळाली रमाईने संपुर्ण जिवन बाबासाहेब यांच्या समाज कार्याप्रती समर्पित केले शांती ने धर्याने सर्व दुख सहन केले डॉ बाबासाहेब आंबेडकर thougtht ऑफ़ पाकीस्थान हा ग्रथं रमाईला अर्पन करताना लिहतात की रामू च्या ह्रदयाचा चांगूलपना फुलाच्या सुंगधापेक्षा ही तीच्या चारित्र्याचा सुंगध मनाची कूलीनता आनी शीलाच्या पावित्र्यासह तीचे शालीन मनोधर्य दुख सोसन्याची तयारी इतक्या पुज्य स्त्री ला 24 तासापैकी अर्धा तास सुधा देवू शकलो नाही ही खंत ड्रा बाबासाहेब आंबेडकर बहीसकृत भारत मध्ये व्यक्त करतात लंडन अमेरिका येथे राहीलो पन रमाई ला एक साडी घेवू शकलो नाही हे दुख बाबासाहेब यांच्या मनात कायम कोरून राहीले कष्ट त्याग संगर्ष मातृत्व प्रेम नम्रता स्वाभीमान या गुणामुळे ड्रा बाबासाहेब आंबेडकर निस्सीम प्रेम रमाईवर करत बाबासाहेब यांना महामानव बनवीन्याचे ऐतीहासीक कार्य रमाईने केले भारतातिल संपूर्ण महीलाना रमाईचरित्रातुन आयुश्यात खंबीरपणे लढन्याची ताकत धर्य संगर्ष स्वाभीमान सामर्थ्य धाडस आत्मविस्वास नियोजब्ध गृहीनी प्रयत्नवादी सकारत्म्क विचारसरनी मिळुन रमाई रडनारी नव्हे तर कठिण परिस्थितीवर मात करनारी जगातिल सर्वात मोठी मानसीक योध्दा मिळेल असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी केले लताताई डोंगरे यांचे माता रमाई आंबेडकर जिवनसंघर्ष एक पात्री नाटक यावेळी सादर करन्यात आले या कार्यक्रमाचे आभार विना राऊत यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close