ताज्या घडामोडी

चंद्रपूर शहराला व आजूबाजूच्या परिसराला सर्वाधिक प्रदूषित बनवण्यासाठी हातभार लावणारे खरे दोषी कोण?

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनाचे भरत गुप्ता यांचा सवाल

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

अख्ख्या विदर्भात चंद्रपुर जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे.एव्हढेच नाही तर आशिया खंडात सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपुर जिल्ह्याचे नाव समोर होत चाललेले आहे.याच चंद्रपूर
जिल्ह्यात रोजगार मात्र नाममात्र उपलब्ध असल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांच्या नावाखाली प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला सर्वस्वी चंद्रपूर जिल्ह्यातील MIDC मधील लाॅयड्समेटल,श्री सिध्दबली इस्पात लिमिटेड, चमन मेंटलीक्स लिमिटेड,गोपानी आयर्न अँड पॉवर लिमिटेड,मल्टि ऑरगॅनिक्स,सनविजय आलाँय अँड पॉवर लिमिटेड,धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेले कोळसा खाणी, आर्यन कोल वाशरीज,सिमेंट कंपनी- ACC सिमेंट,माणिकगढ सिमेंट, अंबुजा सिमेंट,दालमिया व Ultrateche सिमेंट व तसेच एशिया खंडात प्रसिद्ध असलेला चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन(CSTPS)असे अनेक उद्योग जबाबदार आहे.हे उद्योग सुरू करताना नियम व अटीची मान्यता स्विकारून उद्योग सुरू करतात. पण एकदा उद्योग सुरू झाला की अटी व नियमांचे उल्लंघन करतात . हे सत्य नाकारता येत नाही.उद्योग चालक अधिकाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाण करीत सर्रास नियमाची पायमल्ली करत असतात.त्याचेच उदाहरण म्हणजे आज जिल्हा प्रदूषणात अव्वल क्रमांकावर पोहोचलेला आहे.
या जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व उद्योगांची योग्य चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मनसे वाहतूक सेनाचे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता व महिला जिल्हाध्यक्ष प्रतिमा ठाकुर यांनी केली आहे.त्या संदर्भात त्यांनी नुकतेच प्रदुषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना एक लेखी निवेदन सादर केले आहे.या कडे तातडीने लक्ष पुरविले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.दरम्यान चंद्रपूर शहरासह या चंद्रपूर जिल्ह्याला सर्वाधिक प्रदूषित बनविण्यासाठी हातभार लावणारे खरे दोषी कोण ?असा सवाल देखिल त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close