अक्षय कंप्युटर इन्टिटूट ला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन चा उत्कृष्ठ केंद्र पुरस्कार !

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
संगणक साक्षरतेत योगदानाची दखल .
शहरातील अक्षय कॉम्प्युटर्स या संगणक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन चा उत्कृष्ठ केंद्र या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
लातूर येथे आयोजित महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड च्या वार्षिक परिषदेमध्ये बुधवार ४ डिसेंबर रोजी पाथरी परिसर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक साक्षरतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल गेल्या अक्षय कॉम्प्युटर्स या संगणक प्रशिक्षण संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
या प्रशिक्षण केंद्रात एम.एस.सी.आयटी आणि इतर कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी संगणक तंत्रज्ञानात निपुण झाले आहेत.
दरम्यान संगणक प्रशिक्षण संस्थेस मिळालेल्या या यशाबद्दल जि.प.चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे व मित्र परिवार यांनी अभिनंदन व स्वागत केले आहे .
च
हा पुरस्कार आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असुन एम.एस.सी.आयटी अभ्यासक्रमाद्वारे संगणक साक्षर झालेल्या आणि यशस्वी करिअर घडवलेल्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार समर्पित करतो. एम.के.सी.एल ने दिलेल्या या व्यासपीठामुळे आमच्या प्रयत्नांना एक वेगळा दर्जा मिळाला आहे.