LED बल्ब व्यवसायातून महिला बनल्या स्वावलंबी
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
सध्याच्या युगात महिलाही पुरुषा प्रमाणे प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. काही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्या जीवनात प्रगती करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, मुल यांच्या मार्गदर्शनाखाली भादूर्णी गावातील महिला आपला विकास साधत आहेत. सौ. बालुशाही रायपुरे यांनी पुढाकार घेऊन जिजाऊ महिला ग्रामसंघ अंतर्गत जिज्ञासा उत्पादन गट यांनी LED बल्ब बनविणाचे प्रशिक्षण वर्धा येथून घेतले व सुरुवातीला 30 हजार रुपये गुंतवणूक करून व्यवसायाला सुरुवात केली. आज घडीला सर्व खर्च जाता त्यांना 10 ते 15 हजार रुपये निव्वळ नफा मिळत आहे . दिनांक 16/6/2021 ला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल येथील श्री.प्रकाश तुरणकर तालुका व्यवस्थापक(IBCB), श्री. निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक(MIS), जयश्री कामडी तालुका समन्वयक(FL), श्री. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, श्री. मयूर गड्डमवार (CAM) यांनी भेट देऊन व्यवसायाबद्दल चर्चा केली व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.