ठिय्या आंदोलनाचा 42 वा दिवस
आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे चंद्रपूरात आंदोलन सुरूच
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे रास्त मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत आहे.या आंदोलनाचा आजचा 42 वा दिवस असल्याचे रविन्द्र उमाठे यांनी सांगितले.
मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आशा वर्कर व गटप्रवर्तक सहभागी झाल्या आहेत. मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा काॅ. रविन्द्र उमाठे काॅ.प्रकाश रेड्डी व नेहा जगताप यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.
मुंबईच्या ही आझाद मैदानावर गेल्या दोन आठवड्यांपासून आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू असून अद्यापही शासनाने त्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेतली नाही .