ताज्या घडामोडी
परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील पंचबावडी / कुंभारबावडी हनुमान हे परम पूज्य श्री साईबाबांचे कुलदैवत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आजही येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री साई स्मारक समिती पाथरीचे सचिव तथा कोषाध्यक्ष विश्वस्त अॅड. अतुल दि चौधरी यांचे शुभहस्ते ध्यान मंदिरातील हनुमानाला महाभिषेक करण्यात आला. पूजेचे पौरोहित्य श्री योगेश गुरु वाळूजकर शास्त्री यांनी केले. प्रसंगी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ना के कुलकर्णी, बालाजी बेदरे, शिवकन्या नागठाणे उपस्थित होते. अशी माहिती मंदिर अधीक्षक सौ छाया कुलकर्णी यांनी दिली.