ताज्या घडामोडी

संसद व संविधान समजणे हेच खरे समस्या निराकरण करण्याचे संसाधन होय – :माधवभाऊ जिवतोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव विकास केंद्रित कामाला संविधान समजून कार्य करा .

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

संविधानिक अधिकाराची पायमली खरी झाली ती संविधान न समजण्याच्या कार्यामुळे व जे सांसद संसदेत जातात ते योग्य संविधानाचा वापर न करता राष्टप्रेमा पेक्षा धर्म प्रेम करून जनसामान्यांच्या समस्यावर निराकरण करण्यापेक्षा ती वाळीला कारणीभूत ठरली असून ते संविधानिक हक्काच्या अधिकाराला न समजून घेणे हेच मोठे दुःख असून, संविधान समजून हक्कासाठी लढणे हाच खरा समस्या निराकरण करण्याचा खरा मार्ग होय,त्या साठी सांसद व संविधान समजून घेणे ही काळाची गरज झाली असल्याचे वैक्तव्ये माधवभाऊ जिवतोडे (भद्रावती )सामाजिक कार्यकर्ते यांनी निवली येथील मोहितकर परिवाराच्या आनंद उत्सव सोहळ्याच्या ज्ञान सूर्य ड्रा. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंतीच्या औचित्यवर जि. पं शाळेच्या खुल्या रंगमंच्यावर उपस्थित जनसमुदायापुळे विचारमथन केले.
ह्या कार्यक्रमाच्या वेळी विचारमंच्यावर सामाजिक कार्याचे अग्रेसर विचार वंत माधवभाऊ जिवतोडे, कपिल राहुत, दत्ता भाऊराव बोबडे भारतीय वार्ताचे सपादक, मुख्याध्यापक ननावरे, सरपंच, पोलीस पाटील ताजने, मोहितकर मॅडम, यांची उपस्थिती या वेळी होती.
प्रथमता उपस्थितीत मान्यवराच्या वतीने दोन्ही महामानवाच्या फोटोला दीपप्रज्वलीत करून माल्याअर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की जो पर्यंत संविधान भारताच्या नागरिकांना समजणार नाही तो पर्यत
भारतात लोकशाही काम करणार नाही’कारण संविधान ही समस्या निराकरणाची जननी आहे,असे वैक्तव्ये या वेळी केले. कपिल राहुत यानी बाबासाहेब हे जगाला कळाले पण भारतातील मूलनिवासी नागरिकांना का कळले नाही?त्याचे कार्य हे स्वातंत्र, समता, बंधूत्व हे नांदवण्याचे असताना, श्रुष्टीतील सजीव, निर्जीव व्यवस्थेला न्याय देणारे असताना ते न समजून घेणे एक कोडे असून
लोकशाहीचा लवाजमा… पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान, इत्यादी पूर्तता मर्यादित का?असा प्रश्न त्यानी विविध उद्याहरण देऊन समजुन सांगितले.यावेळी इतर मान्यवरानी जातिव्यवस्था ही समाजव्यवस्था बदलत नाही… शांततामय मार्गाने व्यवस्था बदलायला वेळ लागेल, पण कुणीतरी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ना?त्या साठी तथागताचा मध्यम मार्ग स्वीकारून समस्या व निराकरण केले पाहिजे असे विचार मथन केले, या वेळी पंढरी मोहितकर परिवारा तर्फे उपस्थितीत मान्यवराना संविधान पुस्तकं भेट देण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्टसंत तुकडोजी महाराज प्रचारक ताजने यानी केले, तर प्रास्ताविक ननावरे गुरुजी यानीकेले. आभार प्रदर्शन विजय यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close