ताज्या घडामोडी
रुग्णवाहिकेची ट्रकला पाठीमागून धडक

रुग्णवाहीकेचा चालक किरकोळ जखमी
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावाजवळ आज दि.25 नोव्हेंबर रोज गुरवारला रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रुग्णवाहिकेचा चालक किरकोळ जखमी झाला आहे तसेच रुग्णवाहिकेचा
समोरील भाग क्षतिग्रस्त झाला आहे.सुदैवाने रुग्णवाहिकेमध्ये कोणताही रुग्ण नसल्याने होणारे नुकसान टळले.
दिनांक 25 नोव्हेंबर ला दुपारच्या सुमारास रुग्णवाहिका क्र. MH 14 CL 1146 चंद्रपुर वरून अहेरीकडे येत असतानाच अचानक रुग्णवाहिका चालकाचा अंदाज चुकल्याने विठ्ठलवाडा गावाजवळ त्याच दिशेने जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सदर अपघात घडला. धडक जोरदार असल्याने रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग क्षतिग्रस्त झाला आहे.रुग्णवाहिका चालकाचे नाव विनोद नरतम असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.