पाथरी-सेलू रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उद्या माननीय आमदार बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा रास्ता रोको
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मागील अनेक वर्षे पाथरी-सेलू राष्ट्रीय महामार्ग क्र. B-548 हा रस्ता दुरवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या महत्वपुर्ण प्रश्नावर 10 ऑगस्ट रोजी रास्तारोको आंदोलनाची घोषणा करून उपस्थित राहण्याचे आवाहन माननीय आमदार बाबाजानी साहेब यांनी केले.
सेलू ते पाथरी राज्य मार्गाचे केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग म्हणून हस्तांतरण झाले आहे त्यास राष्ट्रीय महामार्ग क्र. B-548 हा क्रमांक देण्यात आला. परंतु या विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांना हे खड्डे चुकवताना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक या अपघात या ठिकाणी मागील काळात घडले. या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून प्रवासी व मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या रोडवरून रहदारी करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
साखर कारखान्यासमोरील भागात या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. बाहेरगावावरून व आसपासच्या गावातील पाथरी येथे येणाऱ्या प्रवासी बांधवांना याचा त्रास होत आहे. सिमुर गव्हाण पासून पाथरीपर्यंत या रस्त्यावर असंख्य खड्डे झाले आहेत. मागील काळात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र सेलू पासून केवळ सिमुर गव्हाण पर्यंतच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.
हा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी जनआंदोलनाची गरज असल्याचे या बैठकीत नमूद करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला आसपासच्या गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माननीय आमदार बाबाजानी साहेब यांनी केले आहे
दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, सेलू कॉर्नर पाथरी.