पांढरवाणी येथे सर्व संत स्मृतिदिन महोत्सवाचे आयोजन

ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची 56 वी सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
भक्ती मार्गातून लोकशिक्षण, समाज जागृती, राष्ट्रसेवा साधनारे व परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीचे रणसिंग फुंकणारे युगप्रवर्तक विश्वसंत ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यतिथी महोत्सव तथा सर्व संत स्मृतिदिन, हनुमान जयंती महोत्सव दिनांक 14 ते 16 जानेवारी 2025 मंगळवार ते गुरुवार या कालावधीत श्री गुरुदेव सेवा मंडळ पांढरवाणी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे या कालावधीत विविध कार्यक्रमास संपन्न होत आहे.
सदर कार्यक्रमात ग्रामसफाई, सामुदायिकध्यान, रामधुन, सामुदायिक प्रार्थना, भजन, रांगोळी स्पर्धा ,भजनसंध्या, महिला मेळावा व मार्गदर्शन, कीर्तन, जागृतीभजन तसेच विविध महाराजांची मार्गदर्शने त्यात आनंदराव कडुकार, प्रकाश गोहणे, मंजुषाताई वाघमारे, अरविंद देवतळे, गजानन ठाकरे, नीलकंठ सूर्यवंशी, चरणदास पोहनकर, रवींद्र चुटे, सुखदेव ढोणे, रामदास सोयाम ,टिकाराम वाघमारे ,डॉक्टर गोपीचंद गजभे, यांचे मार्गदर्शन होणार आहेत. तसेच राष्ट्रसंताच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन चिमूर निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कीर्तीकुमार भांगडिया तथा शालूताई घरत, विठ्ठल सावरकर, प्रा. राम राऊत ,घनश्याम चापले, सुधाकर पिसे, भोयर सर, भक्तदास जीवतोडे, डॉक्टर श्यामजी हटवादे, मंगेश धाडसे, दादाराव पिसे, पत्रुजी दडमल, रवींद्र पंधरे करणार आहेत तरी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आव्हान श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा समस्त पांढरवाणी वाशीयांनी केला आहे.