ताज्या घडामोडी

दरूर येथील 17 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपीपरी तालुक्यातील चेक दरूर येथील 17 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.4 जानेवारी रोज मंगळवारला चेक दरूर शेत शिवारात घडली आहे.
मृतकाचे नाव गौरव उर्फ डोनेश्वर नागापुरे रा.चेक दरूर वय 17 वर्ष असे असून प्राप्त माहिती नुसार गौरव उर्फ डोनेश्वर
बैलाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेला होता.
शेतातील विहीरीतुन पाणी काढत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो विहिरीत पडला.
विहिरीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्याला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली.
लगेच गोंडपीपरी पोलिसाना माहिती देण्यात आली असता
घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले असून मृतकाचा मृतदेह विहिरी बाहेर काढन्यात आला असून उत्तरणीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे पाठविण्यात आला आहे.
पुढील तपास गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेम चव्हान, पुलगंमकर कापसे
पोलीस करीत आहे.
अश्यातच आज बैलांना पाणी पाजन्यासाठी शेतात गेला असता विहिरीतुन पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला अन तो विहिरीत पडला.
त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडल्याने
नागापूरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून
चेक दरूर परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close