मुजो नावाच्या व्यक्ती ब्लॅकमेल करण्यासाठी करतो माहिती अधिकार पत्रांचा गैरवापर
प्रतिनिधी : चक्रधर मेश्राम गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र कोरोना महामारिचे संकट पसरले असतांनाही जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत चालू राहावी यासाठी जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांनी, वाडऀ बाय तसेच इतर कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता सतत आरोग्य सेवा देण्याचे उत्तम कार्य केले. बऱ्याच आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. आजही कोरोना महामारिचे संकट उभे आहे. तिसऱ्या लाटेचा विचार करून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली पाहिजे यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत.
परंतु स्थानिक पातळीवर स्वतः ला फार मोठा पत्रकार समजून घेणारा मुजो. हा दररोज कार्यालयात काम नसतांनाही काही हितचिंतक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टेबल जवळ बसुन दिवसभर काय.. काम करतो हे मात्र कळत नाही. रोज…. रोज, तासान् तास या मुजो नावाच्या व्यक्तीचे जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यालयात काम असते तरी काय ❓ असा प्रश्न टेबलच्या समोर तासनतास बसुन राहिल्याने उपस्थित होत असल्याची चर्चा सुरू आहे. हा मुजो नावाचा व्यक्ती अनेक प्रकारचे ठेके घेतो. हा मुजो नेहमीच जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कार्यालयात काम करणाऱ्या सुहास मडावी , वंदना लाडे मॅडम, आणि विल्सन मॅडम यांच्या टेबल समोर बघतांना दिसून येतो. मुजो या मुजोराने या कार्यालयात शंभर च्या जवळपास माहिती अधिकार पत्र टाकले असल्याचीही चर्चा सुरू आहे. कुठल्याही प्रकारची माहिती घेतली जावी यात शंका नाही. परंतु माहिती घेण्यासाठी किती वेळा पत्र टाकले पाहिजे.. हे सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे कळते. परंतु या मुजो ला का कळत नाही?? हा मुजो गडचिरोली शहरात स्वत:ला इतका हुशार का समजतो?? असा प्रश्नही अनेक ठिकाणी ऐकावयास मिळाले आहे. हा मुजो जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडूनच कार्यालयीन आणि प्रशासकीय माहिती घेऊन त्यांनाच ब्लॉकमेल तर करित नाही ना? (माहिती अधिकारात माहिती मागणी करुन) अशाही चर्चा या मुजो च्या बाबतीत ऐकावयास मिळत आहेत.